थंडी संपली आणि कडक उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ऋतू बदलल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले पदार्थ पुरवणे गरजेचे असते. त्यामुळे जीवनमानासोबतच खानपानात लक्ष घालणे आवश्यक बनते. त्यासाठी उन्हाळात असे काही पदार्थ खायला हवे ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढेल. कोणते आहेत हे पदार्थ, चला तर जाणून घेऊयात.

काकडी :

काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. उन्हाळ्यात काकडी खाल्याने पोटाचे विकारही दूर होतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. त्यामुळे उन्हाळात शरीरासाठी काकडी गुणकारी ठरते.

दही :

दही शरीराला आतून थंड ठेवते. दही तुम्ही विविध प्रकारेच्या पदार्थात टाकून खाऊ शकतात. जसे की ताक, कोशिंबीर तयार करून. दही सिजननुसार मिळणाऱ्या फळांमध्ये टाकून तुम्ही खाऊ शकतात तसेच स्मूदी तयार करूनही त्याचे सेवन करू शकतात.

पुदिना :

पुदीना आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतो. उन्हाळ्यात पुदिना खाल्यास शरीर गार राहते. पुदिन्याचा रस, किंवा इतर रसांमध्ये पुदिना टाकून आपण तो रस पिऊ शकतो. तसेच पुदिन्याची चटणी तयार करून ही ती रोजच्या जेवणात खाल्यास शरीराला त्याचे फायदे होतात.

लिंबू पाणी :

दिवसांची सुरुवात लिंबू पाण्याने केल्यास दिवस प्रसन्न जाईल. उन्हाळात रोजच लिंबू पाणी प्यावे. एक ग्लास लिंबू पाण्याचे अनेक फायदे आहेत. चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही लिंबू पाण्यात मीठ, एक चुमूट जिरे पावडर टाकून त्याचे पाणी पिऊ शकतात.

दुधी भोपळा :

दुधी भोपळ्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. यात व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, लोह, मॅग्निशिअम, पोटॅशियम आणि जिंक असते. ही पोषक तत्व शरीराला आजारापासून दूर ठेवतात. भोपळ्याचा ज्यूस मधूमेह असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यात पिल्यास त्यांना त्याचा फायदा होतो.