चित्रपटातील हिरो प्रमाणे तुम्हालाही पिळदार शरीर हवे आहे का? हा प्रश्न केला तर प्रत्येकाच उत्तर होच असेल. बलदंड आणि पिळदार शरीराचे सगळेच चाहते असतात. बॉलिवूडमधील हिरो टायगर श्रॉफही त्याच्या या पिळदार शरीरामुळे प्रसिद्ध आहे. नुकताच टायगरचा ‘बर्थडे’ झाला, आणि आज आपण त्याच्या पिळदार शरीराचं रहस्य जाणून घेणार आहोत. जे फॉल्लो करून तुम्ही पण पिळदार शरीर कमावू शकतात.

टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 मध्ये मुंबईत झाला. टायगरच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. टायगरने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच त्याला व्यायामाचीही आवड आहे त्यामुळे तो नियमित व्यायाम करतो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो कठोर मेहनत घेत असतो. त्याची ही सवय तुम्हीही फॉल्लो करू शकतात.

टायगर डाएट देखील मेंटेन ठेवतो. तो खाण्यामध्ये ओटमिल, अंडे, भाज्या, ब्राऊन राईस, ड्रायफ्रूट खातो. तसेच हो धूम्रपान आणि मद्यपान टाळतो. टायगरचे डाएट तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने फॉल्लो करू शकतात.

टायगर फुटबॉल, किक बॉक्सिंग आणि जिमन्यास्टिक ही करतो. ताइक्वांडो आणि वुशुचाही तो अभ्यास करतो. एक माहितीनुसार, टायगरने ‘बाघी 3, मध्ये फिट आणि लिन लुक दिसण्यासाठी 6 टक्क्यांपर्यंत बॉडी फॅट कमी केले.