वजन वाढल्याने अनेक जण तणावात असतात. बसून काम, व्यायामाचा अभाव, न चालणे ही वजन वाढण्यामागील कारणे. मात्र तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इतर उपायांसोबत आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्याचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरेल. चाला तर जाणून घेऊयात या 5 मसाल्यांबद्दल.
काळी मिरची :
एक अहवालानुसार, काळ्या मिरचीत पाईपरिन नावाचे तत्व असते. याशिवाय त्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरीचा समावेश असतो. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हे समोर आले की, पाईपरिन वजन कमी करण्यात परिणामस्वरूप काम करते. पाईपरिनयुक्त पदार्थांच्या सेवनाने शरीराचे वजन, कोलेस्ट्रॉल पातळी कमी होते.
मेथी :
मसाल्यांमध्ये असलेले मेथीचे बिया वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. अनेक वर्षांपासून मेथीच्या बियांचा वापर विविध आजार टाळण्यासाठी केला जातो. मात्र गर्भवती स्त्रियांनी मेथीच्या बिया खाणे टाळले पाहिजे. वजन कमी करण्यासाठी आपण मेंटकूटचा वापर भाज्यांमध्ये करू शकतो.
आले :
जर तुम्ही आल्याचे सावन करत असाल तर आले तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. याशिवाय, खोकला, सर्दी, अपचन या संबंधित आजारही आले खाल्याने दूर होतात. चहामध्ये आले टाकून चहा पिल्यास आराम मिळतो. आल्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अनेक व्हिटॅमिन्स, माग्नीज याचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्याला आजार होण्यापासून वाचवतात. आले काढा बनवून किंवा भाजीत टाकून खाल्याने मेटाबॉलिज्म देखील ठीक होतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
दालचिनी :
दालचिनीचा वापर मांसाहारी पदार्थांमध्ये केला जातो. परंतु तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर ही मात्रा त्यावर प्रभावकारी ठरेल. त्यामुळे आपल्या जेवणात तुम्ही दालचिनीचा वापर नियमित स्वरूपात करू शकतात. दालचिनीचा चहा, काढा किंवा भाज्यांमध्ये टाकून एका निश्चित स्वरूपात दालचिनीचा वापर करता येईल. याचा मधुमेही रुग्णांनादेखील याचा फायदा होतो.
लवंग :
लवंग आणि त्याचे तेल दातांच्या आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. असे असले तरी वजन कमी करण्यासाठीही लवंगचा वापर होतो. यातील अँटी ऑक्सिडेंट तत्व अनेक आजारांपासून शरीराला वाचवतात. हाय कोलेस्ट्रॉल पातळी देखील लवंग नियंत्रणात आणते.