तुम्हाला केस विंचरताना केस गळतीची भीती वाटते का? ही केस गळतीची समस्या आपला आत्मविश्वास कमी करते का? असे असेल तर यावर घरगुती उपाय करणे नक्कीच आपल्या हातात आहे. जसे की लिंबाच्या पानांचा वापर, खानपानात बदल, नैसर्गिक तेलाचा वापर, कांद्याच्या रस केसांना लावणे. चला तर मग या उपयांबद्दल जाणून घेऊयात!
कडूलिंबाच्या पानांचा वापर :
बऱ्याच काळापासून असणारे जुने विकार आणि कोविड यामुळे अनेकांना केसगळतीच्या समस्या जाणवल्या. केस वाळवण्यासाठी आपण टॉवेलचा वापर केला तरी टॉवेलला केस चिटकून येतात असे प्रकार अनेकांसोबत घडतात. तसेच अनेकांना कोंड्याची समस्या असते. ही त्वचेची समस्या आणि केसगळती कडूलिंबाच्या पानांच्या वापराने रोखता येते. तुम्ही कडूलिंबाची पेस्ट करून केसांना लावू शकतात. आठड्यातून एकदा तुम्ही कडूलिंबाच्या पाण्याने केस स्वच्छ करू शकतात. त्यासाठी कडूलिंबाची पाने गरम पाण्यात उकळून ते पाणी कोमट झाल्यावर त्याद्वारे केस धुता येतात.
खानपानाच्या सवयीमध्ये बदल :
केस मूळापासून मजबूत करण्यासाठी योग्य प्रोटीन शरीरात जाणे आवश्यक असते. आपल्या केसांना कॅरेटिन तयार करण्यासाठी योग्य आहाराची गरज असते. शक्यता धुम्रपान अथवा कोणतेही व्यसन करणे टाळले पाहिजे. दिवसभरात दोन तीन प्रकारची फळे खाणे हे देखील तितकेच प्रभावी ठरते. तसेच आहारात सर्व भाज्यांचा समावेश असावा.majh
व्हिटॅमिन डी आवश्यक :
जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर केसगळतीची समस्या होऊ शकते. यावर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेऊ शकतात.
घरी तयार करण्यात आलेले तेल :
बाजारात अनेक प्रकारचे सुगंधी आणि आयुर्वेदिक तेल उपलब्ध आहेत. परंतु केस चांगले करण्यासाठी एका कपात नारळाचे तेल घेऊन ते कमी आचेवर गरम करावे. या तेलात 8 ते 9 कडीपत्याची पाने आणि आवळ्याचे तुकडे टाकून ते उकळून घ्यावे. हे तेल गाळू, थंड करून केसांची मसाज करावी.
नारळाचे दूध :
नारळाच्या दूधाने डोक्याच्या त्वचेची मसाज केल्याने त्वचेला पोषण मिळते. याशिवाय तुम्ही नॉन सल्फेट शॅम्पू वापरू शकतात. घरी शॅम्पू तयार करण्यासाठी रिठा, आवळा, शिखेकाई हे अर्धा लिटर पाण्यात उकळून ते थंड करून त्याने केस धुवावेत.
कांद्याचा रस :
केस काळेभोर आणि मोठे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या रसाचाही वापर करू शकतात. कांद्यात सल्फरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे कोलाजन तयार होते आणि केसांची वाढ होते. त्यासाठी कांद्याचा रस केसांना लावून केसांची मसाज करावी.