वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रकारचे व्यायाम करतात. परंतु वजन कमी करण्यासाठी सोपा व्यायाम आहे तो म्हणजे चालणे. त्यासाठी घरात असलेल्या जिन्याच्या पायऱ्यांचा वापर करा. जिन्याच्या पायऱ्या चढल्याने आणि उतरल्याने आपल्या शरीराला इतरही खूप फायदे होतात.
वजन नियंत्रित ठेवण्यास मदत
तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर रोज न चुकता जिन्याच्या पायऱ्या चढा आणि उतरा. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा प्रकार आहे. ऑफीसमध्येही जेव्हा असता तेव्हा लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांचा करा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर पायऱ्या चढा आणि उतरा. पायऱ्या चढल्याने हृदयाची गती वाढते, स्नायू बनते, कोलेस्टेरॉल कमी करते आणि चरबी बर्न होते.
शरीर फिट ठेवण्यासाठी
रोज पायऱ्या चढल्याने आणि उतरल्याने आपले शरीर फिट राहते. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
बॅलन्स आणि स्टॅमिना वाढतो
रोज पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्याने आपल्या पायांची बोटे आणि टाचा मजबूत होतात. त्यामुळे शरीराचा बॅलन्स व्यवस्थित राहतो.
मानसिक स्वास्थ्य चांगले राहते
मानसिक तणाव दूर होण्यासाठी जिन्याच्या पायऱ्या चढणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे. कारण पायऱ्या चढल्याने मुड-बुस्टिंग एनर्जी मिळते. त्यामुळे मानसिक तणाव दूर होतो. तसेच मूड चांगला राहतो.
केस गळती टाळण्यासाठी घरगुती उपाय
‘या’ आसनांच्या मदतीने वाढवा एकाग्रता आणि मिळवा मनःशांती