अनेक नवेनवे आजार आल्याने आजकाल आपण बऱ्याचदा आजारी पडतो. काहींना तर सर्दी, खोकला यासाठीही औषधें घ्यावी लागतात. परंतु रोज एक मूठभर चणे आणि गूळ खाल्याने तुमचे शरीर अधिक सुदृढ होऊन तुम्हाला अशा लहान लहान आजारापासून संरक्षण देईल.
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट आणि अन्य पोषक तत्वे असतात. तसेच चण्यांमध्येही भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन बी सह अन्य गुणकारी घटक असतात. जे आपल्या शरीराला अत्यंत फायदेशीर असतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत :
जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असते तेव्हा पोषक तत्त्वांनी भरपूर असणारे जेवण केव्हाही औषध गोळ्यांपेक्षा चांगले. गूळ आणि काळे फुटाणे त्याचेच काम करतात. हे खाल्याने शरीरातील पोषक तत्वांचे प्रमाण वाढते. याचे सेवन अनेक जुन्या आजारांवर उपायकारक करू शकतात. त्यामुळे दिवसातून एकदा एक मीठ काळे फुटाणे आणि गूळ खावा.
पोषक तत्वांचे भांडार :
आपल्या घरात जेवणामध्ये गूळ आणि चण्याचा वापर होणे ही सामान्य बाब आहे. परंतु हे पदार्थ जेवणाशिवाय तसेच खाल्यास त्याचा जास्त फायदा होतो. जे व्हिटॅमिन आणि पोषक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. चण्यांमध्येही प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तर गुळामध्ये सेलेनियम, जस्त याचे अरमान भरपूर असते. भाजलेले फुटाणे तर व्हिटॅमिन बी 6, थियामीन, मागनिज, लोह, कॉपर सारख्या घटकांचा खजिना आहे.
रात्री झोपण्यापूर्वी खावा गुळ :
श्वसना संबंधित समस्यांसाठी रात्री झोपण्यापूर्वी थोडे काळे फुटाणे आणि गुळाचे दुधासोबत सेवन करणे फायदेशीर ठरते.
‘या’ आसनांच्या मदतीने वाढवा एकाग्रता आणि मिळवा मनःशांती
केस गळती टाळण्यासाठी घरगुती उपाय