पित्त, गॅस, अपचन होणे आजकाल सर्वांचीच समस्या होऊन बसली आहे. आपले खराब जीवनचक्र, अयोग्य आहार यामुळे हा त्रास वाढत आहे. पण पित्तापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय आपल्या घरातच असताना आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहेत जे तुमची पित्ताची समस्या कायमची नियंत्रणात आणतील.
पित्तामुळे अनेकांना अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, गॅस होणे अशा समस्या असतात. या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती आणि सोप्पे उपाय पाहू.
1. एक चमचा ओवा पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर मिसळा. त्यात एक चिमूट काळे मीठ टाकावे. हे मिश्रण गरम पाण्यासोबत पिल्याने पित्त, पोट फुगणे, पोटाचे विकार, अपचन आणि सैल गती (लुज मोशन) याला आराम मिळतो.
2. ओवा पोटाच्या विकारापासून मुक्तता मिळवण्यासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे तीन चमचे ओवा घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळून ते मिश्रण सुकवावे. त्यात काळे मीठ टाकून सेवन केल्यास गॅसच्या समस्या निवारण होतात. हे मिश्रण दिवसातून एकदा नक्की सेवन करावे. तसेच एक चमचा ओवा काळ्या मिठासोबत खाल्यास गॅसच्या समस्या लवकर बऱ्या होतात.
3. ओव्यामध्ये थायमोल या घटकाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे अन्न पचन होण्यास मदत मिळते, तसेच पचनशक्ती सुधारते. याशिवाय अर्धा लिटर पाण्यात 3 ते 4 चमचे ओवा मिसळून ते उकळून घ्यावे. हे पाणी उकळून अर्धे होत नाही तोपर्यंत उकळून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण गळून त्यातील उरलेले पाणी प्यावे. यामुळे गॅस होण्याच्या समस्यांचे निवारण होते.
4. याशिवाय पित्त, गॅसच्या समस्येवर उपाय म्हणून एक चमचा ओवा थोड्याश्या गरम पाण्यात टाकून त्याचे 7 ते 10 दिवस न चुकता सेवन केल्यास फायदा जाणवतो. तसेच ओवा, जिरे, आले पूड याचे मिश्रण करून ते सेवन केल्यानेही पित्ताच्या समस्येचे निवारण होते.
ओवा अँटासिडच्या रुपात काम करते. ओव्यामध्ये अँटी अॅसिडिटी गुण असतात. त्यामुळे विविध प्रकारचे मिश्रण करून ओवा खाल्ला जातो.