जिल्ह्यातील कोविड संसर्गाचं प्रमाण नियंत्रणात येत असल्यानं शिशू वर्गातील मुलांचं शिक्षण सुरू करण्यात यावं आणि जम्बो कोविड रुग्णालय येत्या 28 फेब्रुवारीनंतर बंद करण्यात यावेत, असे निर्देश पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करणं आवश्यक आहे. उद्यानं आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्यात. ग्रामीण भागात 60 वर्षावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना वर्धक मात्रा देण्याचे प्रमाण वाढवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.