रात्री झोपताना आणि सकाळी खोबरेल तेल तुमच्या नखांना लावा. थोडावेळ मसाज करा.
अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी नखांवर मालिश करा.
आहारामध्ये कॅल्शियम अधिक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा .
लसणाची एक जाड पाकळी घ्या आणि सोलून नखांवर चोळा. यामुळे नखं लवकर वाढतील आणि मजबूत होतील. हा उपाय आठवड्यातून एकदा करा.
एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू पिळा. त्या पाण्यात तुमचे हात बुडवून ठेवा तसेच लिंबाची फोड नखांवर चोळा.
नखांना ॲपल सायडर व्हिनेगर लावा. त्यामुळे नखे टणक बनतात.
एक चमचा एरंडेल तेल आणि एक चमचा नारळ तेल एकत्र करून कोमट करा. कापसाच्या साहाय्याने नखांवर लावा.
ऑलिव्ह ऑईल कोमट करून नखांवर लावा. हे तेल नियमितपणे वापरा.
नखांवर बेकिंग सोडा लावून नखांवर चोळा. तसेच सोड्यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही मिसळू शकता. यामुळे नख मजबूत होतात शिवाय नखांवरील पिवळसरपणा दूर होतो.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना कोणती काळजी घ्यावी; जाणून घ्या
चेहऱ्याला बॉडीलोशन लावत असाल तर, सावधान होऊ शकते चेहऱ्याचे मोठे नुकसान