माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : फिटनेस राहण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. त्यामुळे वजन नियंत्रित रहावे असे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, काही जणांना वजन वाढण्याच्या समस्येवर काही उपाय सापडत नाही. परंतु अशी 5 रहस्य आहेत जे तुमचे वजन नक्कीत कमीही करेल आणि नियंत्रणात ठेवेल. (5 tips and tricks for lose weight)

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

20 मिनिटे व्यायाम
रोज सकाळी किमात 20 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. जे लोक सकाळी व्यायाम करतात ते सडपातळ आणि निरोगी असतात. सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर उत्साहही टिकून राहतो.

सतत खाणे टाळा
सतत जेवण्याचा किंवा काहीही खाण्याचा विचार टाळा, त्यासाठी काही अॅक्टीव्हीटी किंवा छंद जोपासा, त्यामुळे तुम्ही कामात व्यस्त राहून खाण्याचा विचार तुमच्या डोक्यात येणार नाही.

हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

बाहेरील पदार्थ खाणे टाळा
जास्तीत जास्त घरी जेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीरातील चरबी नियंत्रणात राहिलं आणि अतिरिक्त चरबी लवकर कमी होईल.

प्रथिनांचे सेवन करा
चरबी कमी करण्यासाठी आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा. चीज, अंडी, स्प्राउट्स, चिकन, मासे किंवा मांस खा. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)