देशात H3N2 एन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात हरियाणा आणि कर्नाटकमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कर्नाटकातील 82 वर्षीय व्यक्तीचा H3N2 मुळे मृत्यू झाला असून एन्फ्लूएंझामुळे मृत्यू होणारा हा देशातील पहिला रुग्ण आहे. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. हरियाणातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या एका 56 वर्षीय रुग्णाचा H3N2 इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूच्या वाढत्या प्रकरणांसंदर्भात आढावा बैठक घेतली. राज्यांना सतर्क राहण्यासाठी आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.