माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सध्या जगभरातील सुमारे १७.५ टक्के प्रौढ लोकसंख्येतील दर सहा व्यक्तींपैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने ग्रस्त आहे. श्रीमंत देशांमध्ये हे प्रमाण सरासरी १७.८ टक्के आहे तर गरीब देशांमध्ये १६.५ टक्के आहे. यासंबंधित अहवाल WHO ने सादर केला असून त्यात ही माहिती पुढे आली. (Infertility Problems)
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
जेव्हा एखादे जोडपे एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरीत्या प्रयत्न करूनही गर्भधारण करू शकत नाही, तेव्हा ते जोडपे इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त असल्याचे मानले जाते. दरम्यान, जगभरातील सुमारे १२.६ टक्के लोक काही काळ वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करत आहेत. या समस्येमुळे अनेकांना सामाजिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या १९९० ते २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या १३३ वेगवेगळ्या अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारे ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. यातील ६६ अभ्यास विवाहित पती- पत्नीवर करण्यात आले तर ५३ अभ्यास अविवाहित पण एकमेकांसोबत राहणाऱ्या लोकांवर करण्यात आले, याशिवाय ११ अभ्यास असे अभ्यास होते ज्यात वैवाहिक स्थितीबद्दलची माहिती उघड झाली नाही.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
भारतात सर्वाधिक लोक मूल-बाळ होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक खर्च करतात, असेही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. जगभरातील अनेक जोडपी बाळ होण्याच्या उपचारांसाठी किमान एक लाख ७३ हजार रुपये खर्च करतात, तर काही ठिकाणी हा खर्च १५ लाखांहून अधिक आहे.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)