हिवाळ्यात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. त्यासाठी आपण औषधे घेतो. परंतु त्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते करून पाहा नक्की आराम मिळेल.

सूप प्या
तुम्हाला जर सर्दीचा त्रास होत असेल तर तर सर्वात सोपा उपाय म्हणजे सूप घ्या. याचे सेवन केल्याने तुम्हाला नक्की फरक जाणवेल. सूपमध्ये कांदे, लसूण आणि अतिरिक्त भाज्या देखील टाकू शकतात ज्यामुळे त्याची चव वाढू शकते.

लसूण
लसूण सर्दी टाळण्यास आणि त्यांची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतो.

हळद
हळद हा पदार्थ आपल्याला घरात सहज मिळतो. त्यामुळे सर्दीचा त्रास होत असेल तर त्यावर प्रभावी उपाय म्हणजे हळद. कोमट दुधात हळद मिसळून प्या. असे केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

टीप- दुग्धजन्य पदार्थ टाळा, मसालेदार, प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा, दिवसातून दोनदा पाण्याची वाफ घ्या, द्रवपदार्थाचे सेवन वाढवा आणि भरपूर विश्रांती घ्या.