शारिरीक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी फळं खा, असा सल्ला दिला जातो. परंतु फळांचा उपयोग त्वचा सुंदर ठेवण्यासाठी केला जातो. कसा तो पाहू-
- कैरी
कैरी असेल तर ती उकळा. त्यानंतर तिचा गर काढा आणि तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर तसेच गळ्यावर लावा. तो गर थोडा सुकू द्या. त्यानंतर काही वेळाने तो धुवून काढा. याचा फरक तुम्हाला दिसून येईल. - संत्र्याची साल
ज्यांना तेलकट त्वचेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी संत्र्यांचा वापर करावा. संत्री खाऊन त्याची साल उन्हात वाळायला ठेवा. नंतर सुकलेल्या सालीची वस्त्रगाळ पूड तयार करा. ती पूड दूधात मिसळा. आता ते मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा. नंतर धुवून काढा. - काकडी
काकडी कट करून तिचे छोटेसे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांना आराम मिळतो. तसेच काकडीचा उपयोग त्वचा ब्लीच करण्यासाठी केला जातो. तुम्हाला त्वचा ब्लीच करायची असेल तर काकडीचा रस चेहऱ्यावर लावा. तुम्ही काकडीचे तुकडेही चेहऱ्यावर ठेवू शकता. नंतर काही वेळाते चेहरा धुवा. - सफरचंद
सावळा रंग उजळण्यासाठी सोप्पा उपाय आहे. सफरचंदाचा रस घ्या. त्यात दोन थेंब गुलाबजल टाका. त्यानंतर तो गर उकडा. मग चेहऱ्याला लावा. नक्की फरक जाणवेल.