आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत डिप्रेशन ही समस्या अनेकांना भेडसावते. औषधोपचारांबरोबरच मन शांत ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी योग हा एक प्रभावी मार्ग आहे. काही सोपी पण परिणामकारक योगासने डिप्रेशन कमी करण्यास, मन स्थिर करण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया डिप्रेशनवर उपयुक्त अशी काही योगासने –
भुजंगासन (Bhujangasana – Cobra Pose)
या आसनामुळे छातीचा विस्तार होतो, फुफ्फुसांना चांगली ताकद मिळते आणि शरीरात ऊर्जा संचारते. तणाव व थकवा कमी होतो.
आसन कसे करावे
सुरूवातीला पोटावर झोपा. हाताचे दोन्ही तळवे मांड्याजवळ न्या. आता हात खांद्याच्या बरोबरीने आणा व तळवे जमिनीच्या दिशेने ठेवा. नंतर शरीराचे वजन तळहातावर येऊद्या. मग डोके मागे घेण्याचा प्रयत्न करा. यावेळी छाती पुढे राहिल हे लक्षात ठेवा. अशा स्थितीत 15-20 सेकंद राहा.
सुखासन (Sukhasana – Easy Pose)
ध्यान व श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून मन शांत ठेवण्यास मदत होते. हे आसन एकाग्रता वाढवते आणि मानसिक ताण हलका करते.
आसन कसे करावे
मॅट वा चटईवर मांडी घालून सरळ बसा. आता हाताचे तळवे मांडीवर वा गुडघ्यावर ठेवा. नंतर श्वास घ्या सोडा. तुम्ही असं कितीही वेळ बसू शकता. यावेळी एकच गोष्ट करा की पायांची स्थिती बदलत राहा.
सेतु बंधासन (Setu Bandhasana – Bridge Pose)
या आसनाने मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे मनाला प्रसन्नता आणि शांती मिळते. डिप्रेशन व चिंता कमी करण्यास उपयुक्त.
आसन कसे करावे
सर्वात आधी पाठीवर झोपा. दोन हातांची घडी घाला. आता हळूहळू तुमचे पाय गुडघ्यातून वाकवून जवळ आणा. नंतर जमिनीपासून तुमची कंबर जेवढी शक्य होईल तेवढी वर उचला. श्वास घ्या. थोड्या वेळाने सोडा.
शवासन (Shavasana – Corpse Pose)
शरीर व मन पूर्णपणे रिलॅक्स होतात. यामुळे ताणतणाव दूर होतो, झोप सुधारते आणि मानसिक आरोग्य सुधारते.
आसन कसे करावे
मॅटवर सुरूवातीला झोपा. डोळे बंद करा आणि पाय सरळ सोडा. हात शरीरापासून थोडे दूर ठेवा. आता हळूहळू शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष द्या. हे सर्व करताना श्वास घ्या, सोडा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शवासन करताना कधीही झोपू नका. तुमचे लक्ष फक्त स्वतःवर आणि तुमच्या शरीरावर असेल
