पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. तसेच खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे निर्देश आज झालेल्या कोविड परिस्थितीच्या आढावा बैठकीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदानं सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, भीमाशंकर देवस्थानी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी, लेण्याद्री देवस्थानाबाबत लवकरच निर्णय घेऊ. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.