पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात गेल्या 24 तासात 19 हजार 174 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 5 हजार 705 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर, 2 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच शहरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात सध्या 31 हजार 907 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 54 हजार 174 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर, 5 लाख 13 हजार 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.