सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना व्यायाम करायला भेटत नाही तसेच वेळेवर जेवण होत नाही त्यामुळे विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील मोठी समस्या म्हणजे बेली फॅट वाढणे. आता तर मुलांनाही लठ्ठपणाची समस्या जाणवते.

परंतु या लठ्ठपणावर सोपे उपाय आहेत. ते उपाय केले तर तुम्ही सहज लठ्ठपणा, पोटाची चरबी कमी सहज कमी करू शकता.

– तुम्हाला जर पोटाची चरबी कमी करायची असेल सर्वात सोप्पा आणि महत्त्वाचा उपाय जिऱ्याचे पाणी. रोज सकाळी आणि संध्याकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते.

– दररोज उठून चहा पित असाल तर ते कमी करा आणि त्याऐवजी ग्रीन टी प्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कप ग्रीन टी प्या. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते. तसेच ग्रीन टी प्यायल्याने शुगर, डायबिटीज आणि हाय बीपी या आजारांपासून संरक्षण होते.

– पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणखी एक सोप्पा उपाय आहे. त्यासाठी मेथी, जिरे आणि बडीशेप घ्या. हे सर्व पाण्यात टाका आणि पाणी उकळवा. नंतर त्याचे सेवन करा.

– पोटाची चरबी कमी करण्यासाठी अजवाइन चहा पिऊ शकता.