पुण्यात येत्या दोन मार्चपासून शहरातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. ते पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीसाठी आले होते.

ज्या पालकांना त्यांच्या मुलांना नर्सरी ते सिनिअर केजीसाठी पाठवायचे आहे ते अशा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू शकतात.शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.