पूजेला अथवा सणासुदीला धूप जाळले जाते. धूप लावल्यानंतर घरातील वातावरण प्रसन्न राहते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या सुगंधाचे धूप मिळतात. जाणून घ्या घरात धूप जाळण्याचे फायदे –

निगेटिव्ह एनर्जी कमी होते
धूप जाळल्यामुळे वातावरण सकारात्मक होते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत होते.

घरातील वातावरण प्रसन्न राहते
धूपामुळे मन:शांती मिळते. घरातील वातावरण प्रसन्न राहते.

रोगराई निर्माण करणारे जंतू कमी होतात
घरात धूप जाळल्याने वातावरणातील रोगराई निर्माण करणारे बॅक्टेरिया कमी होतात. वातावरण निरोगी राहते.

मानसिक स्थिती सुधारणे
धुपाचा वापर सर्वात जास्त धार्मिक विधीमध्ये केला जातो. तसेच आयुर्वेदामध्येही धुपाचा वापर करण्यात येतो. मानसिक स्थितीवर प्रभाव टाकण्यासाठी धुपाचा वापर केला जातो.

सुगंधामुळे वाढते स्मरणशक्ती
धूप वेगवेगळ्या सुगंधामध्ये उपलब्ध आहेत. सुगंध माणसाच्या मनाला शांती देतात तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.