मायग्रेनमुळे डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेनमुळे समोरचे न दिसणे, मळमळणे, ओकारी येणे, प्रकाश, आवाज, वास, स्पर्श सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे असे त्रास होऊ शकतात.

मायग्रेन होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. ताण-तणाव‌ कमी करण्याचा प्रयत्न करा.

कडक उन्हात घराबाहेर पडू नका.

प्रखर उजेडात काम करू नका.

डाएटमध्ये फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.

प्राणायम करा.

मायग्रेनवर घरगुती उपाय –

मुबलक प्रमाणात पाणी प्या
मायग्रेनचा त्रास होत असेल तर मुबलक प्रमाणात पाणी प्या. जास्त वेळ उपाशी राहू नका.

साजूक तूप
मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित नाकपुड्यांमध्ये २ थेंब शुद्ध तूप टाका.

कोमट तेल
कोमट तेलाने डोक्याला मसाज करा.

लवंग पावडर
डोकेदुखी कमी करण्यासाठी दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.

सफरचंद
रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा.

दालचिनी
दालचिनी पावडर पाण्यात मिसळून कपाळावर लावा.

काकडी
काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते.

पालक आणि गाजराचा रस
मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.

लिंबाची साले
लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा.