तीळ खाण्याचे फायदे

हाडे मजबूत राहतात
तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात. कारण यात कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर असते.

सांधेदुखीचा त्रास होत नाही
तीळ खाल्ल्यामुळे सांधेदुखी किंवा इतर त्रास होत नाही. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. म्हणून दिवसभरातून एकदा तरी मोठा चमचाभर तीळ खावे. त्यामुळे दातही मजबूत राहतात.

रोगप्रतिकार क्षमता वाढते
तिळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे आपले रोगप्रतिकार क्षमता वाढते.

रक्तदाब नियंत्रित राहतो
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तिळाची चक्की खा. तिळाच्या चिक्कीत ‘सेसमोलिन’ हा गुणधर्म असतो. तो रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

शरीराला लगेच ऊर्जा मिळते
शरीराला जर एनर्जी मिळवायची असेल तर तिळाची चक्की नक्की खा. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेच एनर्जी मिळते. शिवाय थकवा दूर होतो.

त्वचेसाठी गुणकारी
तीळ खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार बनते. तीळ थंडीच्या दिवसात तर नक्की खावेत. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

स्वच्छ लघवी होत नाही, त्यांनी तीळ दूध खडी साखर खाल्ल्यामुळे त्यांचे मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते व लघवी साफ होते.

तिळाचे अतिसेवन करण्याचे तोटे

तिळाचे अनेक फायदे असले तरीही कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन हे घातकच असते. जाणून घ्या तिळाचे अतिसेवन करण्याचे तोटे –

तिळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटदुखी होते, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते.

ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, त्यांनी देखील तीळ कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे किंवा खाणे टाळावे.

गर्भवती महिलांना देखील तीळ न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण तिळामध्ये उष्णता असते.