महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे. शनिवारी (4 डिसेंबर) डोंबिवलीमध्ये ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी 7 जणांची भर पडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 6, तर पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा 1 रुग्ण आढळला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुण्यात शिरकाव केल्यामुळे पुण्याच्या चिंतेत भर पडली आहे.
Seven more people tested positive for the #Omicron variant of COVID19 in Maharashtra. Total 8 cases of Omicron variant reported in Maharashtra so far: State Public Health Dept
— ANI (@ANI) December 5, 2021