पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावेत, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा पार पडली. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा; त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये.

1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्यानं लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा; लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्यात, असंही त्यांनी सांगितलं.